अमृतसर : १९८० च्या दशकात ‘उडान’ या मालिकेतून देशभर लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री कविता चौधरी यांचे गुरुवारी रात्री अमृतसर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्यांचे भाचे अजय सायाल यांनी निधनाची माहिती देताना म्हटले की, कविता चौधरी यांना काही दिवसांपासून लो ब्लडप्रेशरच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. […]