जग मंदीच्या छायेत असल्याचे भाकीत अनेक अर्थतज्ज्ञ करत आहेत. अशातच अमेरिकेच्या क्षितिजावर नवा राजा उदयास आला आहे, जो जगावर टेरिफ वॉर लादून महागाईत आणखी तेल ओतण्याचे काम करत आहे. चेन्नईतील आर्थिक नियोजन तज्ज्ञ डी. मुथुकृष्णन यांनी भारतासमोर काय संकट वाढून ठेवले यावावत सावध केले आहे. निम्म्या भारतीयांकडे साडेतीन लाखांपेक्षाही कमी संपत्ती आहे, तर जगातील ९० टक्के लोकांचे एका पगाराचे जरी नुकसान झाले तरी ते त्या संकटाला तोंड देऊ शकत नाहीत असा दावा केला आहे. #AI #Automation #JobsCrisis #FutureOfWork #TechRevolution
एआय, ऑटोमेशन आणि नोकऱ्यांच्या संकटात आर्थिक असमानता वाढत जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हे संकट एवढे भीपण आहे की अगदी अतिश्रीमंत देशांमध्येही अब्जावधी लोक असुरक्षित वनणार आहेत. संपत्तीचे केंद्रीकरण आणि तांत्रिक समस्या याला कारणीभूत असणार असे त्यांचे म्हणणे आहे. सर्वात श्रीमंत देश असलेल्या स्वित्झर्लंडमध्येही हा फेरा चुकलेला नाही. तिथेही १ टक्के लोकांकडे देशाच्या ४३ टक्के संपत्ती आहे. असे असले तरी स्वित्झर्लंडच्या प्रत्येक व्यक्तीकडे सरासरी ६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. भारतात हा आकडा साडेतीन लाखही नाही. जगाची सरासरी संपत्ती ८,६५४ आहे. जगातील अर्ध्या लोकांकडे ७.५ लाखांपेक्षा कमी संपत्ती आहे.
