मीठ – घरात सतत कलह सुरू असेल तर मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्यावी. मिठाच्या पाण्याने घर पुसल्यास सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते. नकारात्मक ऊर्जा निघाल्याने घराल भांडण – कलह कमी होतात.
बेडवर जेवू नये – अंथरूणावर बसून जेवल्याने आर्थिक संकटांना आमंत्रण मिळते, असे सांगितले जाते. त्यामुळे बेडवर बसून जेवू नये. आर्थिक अडचणी वाढल्याने घरात वाद सूरु होतात. त्यामुळे बेडवर बसण्याची सवय असल्यास त्वरीत सोडा.
चप्पल घरात आणू नये – बाहेरून घरी आल्यावर थेट चप्पला घरात आणण्याची सवय अनेकांना असते, पण, वास्तुशास्त्रानुसार ही सवय योग्य नाही. यामुळे पैशांची संबंधित अडचणी सुरू होतात.
सत्यनारायण कथा – घरात सुख-शांती टिकवण्यासाठी सत्यनारायण कथा ऐकावी. सत्यनारायण हे भगवान विष्णूंचे रूप आहे. त्यामुळे असे सांगितले जाते की, जो व्यक्ती या कथेचे आयोजन करतो त्याच्या घरात सुख-शांती नांदते.
तुपाचा दिवा – घराच्या मंदिरात किंवा दारात तुम्ही तुपाचा दिवा लावायला हवा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते.
कापूर – घरात वारंवार भांडणे होत असतील यामागे वास्तुदोषाचे कारण असू शकते. अशा परिस्थितीत वास्तुदोष कमी होण्यासाठी रात्री झोपण्याआधी पितळेच्या भांड्यात तूपात भिजवलेला कापूर जाळावा. या उपायाने नक्कीच फरक जाणवेल.
