वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
सध्याचा जमाना डिजीटलचा आहे. यातून बाजरपेठेतही मोठे बदल झालेले दिसतात. आपण हे पाहिलं असेल की, बहुतांश वस्तुंवर एक कोड असतो, ज्यातून आपल्याला त्या वस्तुबद्दल माहिती आणि किंमत समजते. ज्याचा वापर बऱ्याचदा मॉलमध्ये केला गेल्याचे आपण पाहतो. अनेक वर्षापासून आपण हा कोड पाहत आलो आहोत. ज्याला बारकोड असे म्हणतात. परंतु, काही काळानंतर बाजारात क्यूआर कोड देखील येऊ लागला. काही प्रोडक्टवर आता क्यूआर कोडने जागा घेतली आह तसेच पैसे देण्यासाठी देखील अनेक ठिकाणी क्यूआर कोडचा वापर केला जातो आहे. मात्र, अनेक लोकांना या दोन कोडमध्ये काय फरक तो लक्षात येत नाही.
जर आपण या दोन्ही कोडची डिझाइन पाहिली तर बार कोड हा एक-आयाताकृती, सरळ रेषेचा गट असतो, ज्यामध्ये कोणत्याही ठिकाणाशी, वस्तूंशी संबंधित माहिती असतो. तर, क्यूआर कोड म्हणजेच क्विक रिस्पॉन्स कोड हा एक रडी कोड आहे, ज्यामध्ये एका रेषऐवजी लहान चौरसांचा समूह आहे आणि त्याद्वारे माहिती घेतली जाऊ शकते आणि माहिती पाठविली जाऊ शकते.
क्यूआर कोड
पेमेंट करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी अनेकदा क्विक रिस्पॉन्स कोड वापरला जातो. दुसरीकडे, एखादे अॅप डाउनलोड करायचे असो, एखादा कार्यक्रम बुक करायचा किंवा वेबसाइटला भेट द्यायची असो, आम्ही क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्ही थेट त्या वेबसाइटवर पोहचता. क्यूआर कोडचा वापर सर्वप्रथम १९९४ मध्ये ऑटोमोबाइलच्या स्पेअर पार्टसशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी करण्यात आला. जो तुम्ही तुमच्या फोन, टॅबलेट किंवा स्कॅनरने स्कॅन करू शकता.
बार कोड
बार कोडच्या माध्यमातून कोणताही माल कुठे बनवला गेला, त्यात कोणते साहित्य वापरले गेले. तो केव्हा बनवला गेला, त्याची एक्सपायरी कधी झाली, तो कोणत्या ट्रेडमार्कखाली बनवला गेला इत्यादी माहिती मिळते. लहान जागेत मोठा डेटा एकत्रित करण्याचा बारकोड हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. बार कोड केवळ वस्तूंच्या पॅकेटवरच नाही तर सिनेमा हॉल, हॉस्पिटल, रेस्टॉरंट इत्यादींच्या बिलांवरही दिसतो. बार कोड स्कॅन करण्यासाठी स्कॅनर आवश्यक आहे. परंतु, नंतर असे काही अॅप आले, ज्याचा वापर करुन तुम्ही तुमच्या फोन, टॅब्लेट किंवा डेस्कटॉपवर एक विशेष अॅप डाउनलोड करून बार कोड स्कॅन करू शकता.