धर्मराज नारायण गुरु महाराजांचा जन्म प्रभु रामचंद्राच्या अयोध्या नगरीतला. त्यांचे मूळ नाव धर्मराज. धर्मराज त्या वेळी जेमतेम सहा-सात वर्षाचे असतील तोच एका रात्री गाढ झोपेत असतांना, करवती काठाचे धोतर नेसलेले, अंगात रेशमी अंगरखा, खांद्यावर जरीचे उपरणे, डोक्यावर जरीची टोपी, डाव्या पायात चांदीचा तोडा, गळ्यात गुलाबाच्या फुलांची माळ, दोन्ही पायात चंदनाच्या […]