ग्राम शिर्ला (अंधारे )(८मार्च) – गीता जीवन ग्रंथ असून तो जिवाचा शिवाशी संवाद आहे असे प्रतिपादन ‘गीता आणि आपण’ या विषयावर बोलतांना जागतिक महिला दिनी श्री सोमपुरी महाराज जेष्ठ नागरिक संघाने आयोजित महिला सन्मान सोहळ्यात त्यांनी केले. तर पुष्पाताई इंगळे माजी अध्यक्षा जि .प. अकोला यांनी भारतीय संविधान घरा घरात वाचण्याची आवश्यकता आपल्या मनोगतात व्यक्त केली .पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्या हेमलता अंधारे यांनी महिला दिन हा बैलपोळा होऊ नये असे विचार व्यक्त केले. कर्तृत्ववान महिलांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला ग्रंथालय परीक्षेत प्रथम वर्गात प्रथम आल्याबद्दल भाग्यश्री गवई, पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड झाल्याबद्दल हेमलता अंधारे, आदर्श सुनबाई म्हणून अनुसया भागाजी खर्डे यांचा तर अंगणवाडी क्र.२ ला आय एस ओ नामांकन प्राप्त झाल्याबद्दल ताईबाई वसतकार यांचा सन्मान करण्यात आला. तसेच अकोला ज्येष्ठ नागरिक संघाचे महिला समितीच्या वतीने संध्याताई संगवई यांनी वीरमाता मंदाबाई निमकंडे व चंद्रभागा ढाळे यांचा सत्कार केला.
सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षपदी वीरमाता मंदाबाई निमकंडे होत्या तर वर्षा पातुरे आणि श्रेया अंधारे यांनी यथोचित सूत्रसंचालन केले. प्रमुख उपस्थितामध्ये डॉ. सुहास काटे सचिव प्रादेशिक विभाग, चोथमलजी सारडा अध्यक्ष कृषी समिती, कृष्णा अंधारे प्रदेश संघटन सचिव राष्ट्रवादी काँग्रेस, चंद्रकांत कुळकर्णी अध्यक्ष अकोला ज्येष्ठ नागरिक संघ, निशाताई कुळकर्णी, प्राचार्य डॉ. सत्यनारायण बाहेती, समन्वय समिती सचिव प्रमोद देशमुख, नारायण अंधारे, रामायणाचार्य महादेव महाराज निमकंडे, गुलाबराव कोकाटे, विरपिता काशीराम निमकंडे, निळकंठराव अंधारे, देविदास अंधारे, उपसरपंच कल्पना खर्डे, सदस्य रेखा गवई, देविदास इंगळे, देविदास निमकंडे, जनार्दन इंगळे (मेजर) उकर्डा ढाळे, धोंडू ढाळे, मीराताई राऊत, आशाताई अंधारे, प्रमिलाबाई अंधारे, हिरूबाई वरणकर, अनंत अंधारे, गजानन अंधारे आणि ग्रामस्थ महिला व पुरुषांची मोठी उपस्थिती होती पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.