वऱ्हाडवृत्त डिजिटल
तंत्रज्ञानाचा मानवी जीवनात कसा उपयोग होतो, जीवन कसं सुकर होतं, हे वारंवार अनुभवायला मिळालं आहे. भारतात मोबाइल तंत्रज्ञानात वेगाने बदल होत गेला. आता चौथ्या पिढीतून पाचव्या पिढीकडे जाताना इंटरनेट, मोबाइलसेवेचा वेग प्रचंड वाढणार आहे. आणखी काही महिन्यांमध्ये देशातली बहतांश शहरं ‘फाईव्ह जी ने जोडली जातील. अर्थात त्यात ‘जिओ’च्या ‘फाईव्ह जी’चं योगदान सर्वाधिक असेल. ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञान आल्यानंतर ‘हायब्रीड वर्क’ कल्चरचा विस्तार होईल. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या मदतीने अनेक गोष्टी स्वयंचलित पद्धतीने करणं शक्य होणार आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना इतर महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करता येईल.
गेल्या काही महिन्यांमध्ये भारतात ‘फाईव्ह जी’ बाबत चर्चा सुरू होती. आता प्रत्यक्षात ‘फाईव्द जी’ स्पेक्ट्रमचा लिलाव झाला. त्यात अपेक्षेप्रमाणे ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या ‘जिओ’ने सर्वाधिक स्पेक्ट्रम लिलावात घेतले. त्यानंतर एअरटेल आणि आयडिया-व्होडाफोनचा क्रमांक लागतो. अदानी उद्योग समूहानेही काही स्पेक्ट्रम विकत घेतले असले तरी त्यांची सेवा सामान्य नागरिकांसाठी खुली नाही. ‘फाईव्ह जी’ सेवा सुरू झाल्यानंतर शहरी आणि ग्रामीण। भागातल्या ग्राहकांना अधिक उत्तम कव्हरेज मिळू शकेल, यासोबतच ग्राहकांना पूर्वीपेक्षा चांगलं इनडोअर कव्हरेजही मिळेल. ग्राहकांना आणखी चांगली कनेक्टिव्हिटी, इंटरनेट आणि डाउनलोड स्पीड मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या स्पेक्ट्रम लिलावानंतर उत्तर आणि पश्चिम भारतात ‘जिओ’ सर्वात मोठा स्पेक्ट्रमधारक बनला आहे. सर्व २२ दरसंचार मंडळांमध्ये प्रीमियम ७०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये ‘फाईव्ह जी स्पेक्ट्रम’ खरेदी करणारा रिलायन्स जिओ एकमेव ऑपरेटर म्हणून उदयास आला आहे. ७०० मेगाहर्टझ ब्रड जगभरात स्टॅड अलोन’फाईव्ह जी’साठी वापरला जातो. अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये याला ‘फाईव्ह जी’ सेवेसाठी ‘प्रीमियम ब्रैड’ घोषित केलं आहे. ___ ‘जिओ’ने ३० जून २०२२पर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये २.१६ कोटी ग्राहक जोडले आहेत. उत्तर प्रदेश पश्चिम सर्कलमधल्या ‘जिओ’च्या विशाल नेटवर्कमध्ये सुमारे ३० हजार किलोमीटर फायबर आणि २३ हजारांपेक्षा जास्त नेटवर्क घटक आहेत. या नेटवर्कमध्ये ९९.५ टक्के लोकसंख्या समाविष्ट आहे. ‘जिओ’च्या बहुतांश साइट्स फायबरने जोडल्या आहेत. त्यात अमर्यादित डेटा वाहून नेण्याची क्षमता आहे आणि ते त्यांच्या प्रतिस्पध्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक सक्षम आहेत. ‘जिओ’ने सर्वोत्तम दर्जाचा डेटा देण्याचं वचन पाळलं आहे.लॉन्च झाल्यापासून, ‘जिओ’ने सातत्याने सर्वात वेगवान ‘फोर जी’ टेलिकॉम नेटवर्क म्हणून स्थान मिळवलं आहे. जुले २०२२ मधल्या ‘ट्राय’च्या डेटानुसार, ‘जिओ’ने राष्ट्रीय स्तरावर सरासरी ‘फोर जी’ची डाउनलोड गती २१.६ एमबीपीएस नोंदवली. ती देशातल्या सर्व ‘फोर जी’ ऑपरेटर्समध्ये सर्वाधिक आहे. आता देशात लवकरच ‘फाईव्ह जी’ सेवा सुरू होत आहे. आघाडीच्या सेवा पुरवठादार कंपन्यांनी त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. एका रिपोर्टनुसार, ‘फाईव्ह जी’सेवेसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आता ‘फाईव्ह जी’मुळे घरापासून उद्योगापर्यंत सर्वच ठिकाणी कमालीची गती येणार आहे. त्यामुळे जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत. ‘फाइव्ह जी’ म्हणजे मोबाइल नेटवर्कची पाचवी पिढी म्हणजेच वेगवान नेटवर्क स्पीड, अखंडित एचडी सर्फिग, उत्कृष्ट सेवा आणि बरंच काही.
‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञान ही सेल्युलर सेवेतली प्रगत टेक्नॉलॉजी आहे. याला ‘फोर जी’नेटवर्कची पुढील आवत्ती म्हटलं जातं. यात वापरकर्त्यांना अधिक नेट स्पीड, कमी लेटेन्सी’ आणि अधिक फ्लेक्झिबिलिटी’ पाहायला मिळेल. आतापर्यंत सेल्युलर तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करत असे; परंतु ‘फाईव्ह जी’ सेल्युलर तंत्रज्ञान एक पाऊल पुढे जाऊन क्लायंटला थेट क्लाउडशी कनेक्ट करेल.सध्या आपण ‘फोर जी’ आणि ‘थ्री जी’ नेटवर्कवरही फाईल्स, व्हिडीओ, फोटो, पीडीएफ डाउनलोड करतो; पण ‘फाईव्ह जी नेटवर्कचा डाउनलोडिंग स्पीड सुसाट आहे. ‘फाईव्ह जी’ नेटवर्कवर काही मिनिटांमध्ये ‘हेवी गेम्स’ आणि व्हिडीओ डाउनलोड करू शकाल. एका रिपोर्टनुसार, ‘फाईव्ह जी’चा डाउनलोडिंग स्पीड ‘फोर जी’च्या शंभरपट वेगवान असेल. ‘फोर जी’चा कमाल वेग ४५ एमबीपीएस इतका मानला जातो, तर ‘फाईव्ह जी’चा वेग एक हजार एमबीपीएसपर्यंत असू शकतो. पापणी लवते न लवते तोच फाइल डाउनलोड झालेली असेल. ‘ऑनलाइन कन्सोल गेमिंग’ची आवड असेल तर ‘फाइव्ह जी’ वरदान ठरेल. ‘फाइव्ह जी’ नेटवर्कवर गेममध्ये कमांड दिली तर ते त्वरित कार्य करेल. त्याचबरोबर ‘फाईव्ह जी’ नेटवर्कवरील गेमिंगचा दर्जाही जबरदस्त असेल. टेस्लासारख्या कंपन्या ‘सेल्फ ड्रायव्हिंग’ कारवर काम करत आहेत. अशा परिस्थितीत या चारचाकीला नेटवर्कची गरज भासणार आहे. त्यामुळे डेटा वेगाने पाठवता येईल आणि प्राप्तही करता येईल. ‘फाईव्ह जी नेटवर्कवर हे काम सहजसाध्य होईल.
जसा घरात प्रवेश करताच आपोआप दिवा लागतो, सेन्सरच्या करामतीमुळे उजेड पडतो, तसाच उपयोग ऑटोमॅटिक कार चालवण्यासाठी होणार आहे. ‘स्मार्ट होम’ची स्वप्नं आता प्रत्यक्षात उतरतील; पण त्यासाठी ‘फाईव्ह जी इंटरनेटची गरज भासेल. चित्रपटगृहांमध्ये, स्मार्ट होम्समध्ये स्मार्ट लाइट, स्मार्ट गेट्स आदी गोष्टी असतात. येत्या काळात ‘फाईव्ह जी नेटवर्कच्या मदतीने लाइटपासून ट्रॉफकपर्यंतची कामं रिअल टाइममध्ये पूर्ण होतील, अशा ‘स्मार्ट सिटीजही पाहायला मिळतील. ‘स्मार्ट सिटी’मध्ये आपल्याकडे अशी सुविधा असेल की, रस्त्यावर कोणीच नसेल, तेव्हा पथदिव्यांचा प्रकाश आपोआप कमी होईल. व्हिडीओ स्ट्रीमिंगमध्ये फोर जीवर फक्त ४ के व्हिडीओ पाहता येतो; पण ‘फाईव्ह जी’ नेटवर्कवर तुम्ही ८ के रिझोल्यूशन असलेले व्हिडीओ पाहता येतील. ‘फाईव्ह जी नेटवर्कमधला डेटा ट्रान्सफर खूप वेगवान आहे आणि यामुळे व्हिडीओ वेगानं लोड होईल. सॅमसंगसारख्या कंपन्यांचे ८ के स्मार्ट टीव्ही बाजारात आले सॅमसंगसारख्या कंपन्यांचे ८ के स्मार्ट टीव्ही बाजारात आले आहेत. त्याची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे.
‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञान आल्यावर इंटरनेटचा वापर प्रभावीरीत्या करता येईल आणि आपली कामं जलद गतीने पूर्ण होतील. हायस्पीड इंटरनेटमुळे शहरं स्मार्ट होतील. अजून बरंच काही करता येईल. आपण त्याचा अजून विचार करू शकत नाही. आपल्याला एखाद्या ठिकाणी आपत्ती निवारणाचं कार्य करायचं असेल, त्या ठिकाणचा अंदाज घेण्यासाठी आपण ड्रोन्सचा वापर करत असू किंवा एखाद्या इमारतीला आग लागली असल्यास ड्रोन्सचा वापर करून परिस्थिती समजून घेता येईल. हे ड्रोन्स एकमेकांसोबत वायरलेस तंत्रज्ञानाने जोडलेले असतील. त्याचबरोबर कंट्रोल रूमसोबतदेखील त्यांचा संपर्क असेल. स्वयंचलित कारदेखील एकमेकांशी संपर्क साधू शकतील आणि मॅप्सशी संबंधित डेटा लाइव्ह शेअर करू शकतील. आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होतील. त्यामुळे आपल्या आयुष्यात नक्कीच बदल होऊ शकेल. ‘फाईव्ह जी’ हाय फ्रिक्वेन्सी बँडवर काम करण्याची शक्यता आहे. ३.५ गिगाहर्ट्झ, २६ गिगाहर्ट्झ या बँडवर किंवा याहून अधिक क्षमतेच्या बॅडवर ‘फाईव्ह जी’चं काम चालेल. या फ्रिक्वेन्सी ब्रैडमध्ये वेव्हलेंथ छोट्या असतात. छोट्या वेव्हलेंथला आरामशीर थांबवता येऊ शकतं. या वेव्हला प्रसारित करण्यासाठी कमी उंचीचे टेलिफोन टॉवर लावावे लागतील, जे एकमेकांपासून जवळ असतील.
जगात सर्वाधिक डेटा वापर भारतात सुरू झाला; पण २०२२ मध्ये नवीन वर्षात प्रवेश केल्यानंतर, टेलिकॉम क्रांतीच्या नवीन युगात प्रवेश होणार आहे. कारण देशात ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञान येत आहे. त्यानंतर मोबाइल आणि इंटरनेट वापरकत्यांचं जग पूर्णपणे बदलून जाईल. ‘फाईव्ह जी’ सुरू झाल्यानंतर व्यवसाय स्वतः चालतील, ऑटोमेशन वाढेल. आतापर्यंत मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित असलेल्या गोष्टी खेड्यापाड्यात पोहोचतील. त्यात ई-औषधं, शिक्षणक्षेत्र, कृषिक्षेत्र यांचा मोठा फायदा होईल. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ आणि रोबोटिक्सचं तंत्रज्ञानदेखील पुढे जाईल. याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल.’ईगव्हर्नन्स’चा विस्तार होईल. ‘फाईव्ह जी’ आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल.’ई-कॉमर्स, आरोग्य केंद्र, दुकानदार, शाळा, महाविद्यालयं आणि अगदी शेतकरीही याचा पुरेपूर लाभ घेऊ शकतील. कोरोनाच्या काळात इंटरनेटवर वाढलेलं प्रत्येकाचं अवलंबित्व पाहता ‘फाईव्ह जी’ आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं जीवन अधिक चांगलं आणि दर्जेदार होईल. ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञान आरोग्यसेवा, आभासी वास्तव, क्लाउड गेमिंगसाठी नवीन मार्ग उघडेल. सरकारने स्थापन केलेल्या पॅनलच्या अहवालानुसार, ‘फाईव्ह जी’ मुळे २०३५पर्यंत भारतात एक ट्रिलियन डॉलरची आर्थिक उलाढाल वाढेल. ‘एरिक्सन’च्या अहवालानुसार २०२६पर्यंत भारतात ‘फाईव्ह जी’मधन २७ अब्ज डॉलरपेक्षा जास्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
-अजय तिवारी