विनाशस्त्रक्रिया उपचारही प्रभावी, निदानाला विलंब ही समस्या

भारतातील सुमारे २५ टक्के लोकसंख्येला ‘व्हेरिकोज व्हेन्स’चा (अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या शिरा फुगणे किंवा ताणणे) त्रास आहे. त्यावर शस्त्रक्रियेशिवाय उपचार केले जाऊ शकतात. परंतु, या आजाराचे निदानच कमी होते, असे प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शस्त्रक्रियांशिवाय असलेल्या उपचार पद्धतींमध्ये अलीकडे झालेल्या प्रगतीमुळे रक्तवहिन्यासंबंधी काळजी घेण्याच्या दृष्टिकोनात बदल घडून येत आहे. ज्यामुळे या विकारावर अगदी दुर्गम भागातही उच्च गुणवत्तेचे उपचार मिळू शकतील. एव्हिस रुग्णालयाने आयोजित केलेल्या इंडियन व्हेन काँग्रेस (आयव्हीसी) २०२४ मध्ये भारतभरातील शंभरहून अधिक वैद्यकीय व्यावसायिकांनी भाग घेतला. ब्राझिलमधील तज्ज्ञ त्यात ऑनलाइन सहभागी झाले. एव्हिस रुग्णालयाचे संस्थापक आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे प्रख्यात तज्ज्ञ डॉ. राजा व्ही. कोपला यांनी या परिषदेसाठी पुढाकार घेतला होता. परिषदेत लेसर उपचार आणि इतर नावीन्यपूर्ण पद्धतींसारख्या विनाशस्त्रक्रिया सर्वोत्तम पद्धती मांडण्यावर भर देण्यात आला.
एव्हिस रुग्णालयाने गेल्या आठ वर्षांत ४०,००० रुग्णांवर विनाशस्त्रक्रिया पद्धतींचा वापर करून यशस्वीपणे उपचार केले आहेत, असे डॉ. कोपला यांनी यावेळी सांगितले. या परिषदेत डॉ. रॉड्रिगो गोम्स, डी. ऑलिव्हेरा आणि डॉ. फर्नांडो ट्रेस सिल्वेरा यांच्यासह आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी आपले रेडिओलॉजीमधील जागतिक प्रवाह आणि आव्हाने यावर विचार व्यक्त केले.
काही वेळा शस्त्रक्रिया आवश्यक – विनाशस्त्रक्रिया पद्धती अत्यंत प्रभावी असू शकते. परंतु, काही वेळा शस्त्रक्रिया आवश्यक ठरते, असा सूर यावेळी चर्चेत तज्ज्ञांनी लावला. ॥ नसांसंबंधीचे दीर्घकालीन आजार भारतीय लोकसंख्येच्या २०-३५ टक्के लोकांना प्रभावित करतात, एंडोव्हॅस्कूलर पद्धतींनी उपचार सुलभ, वेदनारहित केले आहेत, असे सांगण्यात how to solve varicose veins problem