वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अकोला – पाटील समाज अकोला शाखेतर्फे रविवार, १३ नोव्हेंबर रोजी स्थानिक जानोरकर मंगल कार्यालयात वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत राहील. या वेळेत जास्तीत जास्त उपवर मुले मुली व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
सदर मेळाव्याचे उद्घाटक म्हणून हभप तुकाराम महाराज सखारामपुरक,हभप गोपाल महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी पाटील समाज अकोलाचे अध्यक्ष अशोक अमानकर राहणार आहेत.
या मेळाव्याच्या जय्यत तयारीसाठी जानोरकर मंगल कार्यालयात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. अशोक अमानकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेत उपाध्यक्ष विनायक शेळके, रघुनाथ खडसे, सचिव दिनकर सरप, कोषाध्यक्ष राजेन्द्र मोहोकार, प्रसिध्दी प्रमुख प्रदिप खाडे यांचे सह रामेश्वर सपकाळ, प्रा. दत्तात्रय भाकरे, सुनिल जानोरकर, सुरेश गाढे पाटील, दयाराम मेतकर, विनायक गावंडे, निलेश पवित्रकार, विक्रम जानोरकर, वासुदेव कडु, अशोक ढोले, गजानन डिवरे, ज्ञानदेव वनारे, दिलीप मानकर, अविनाश नाकट, शैलेन्द्र काळे, मधुकर महल्ले, दिलीप वाकोडे उपस्थित होते.
या संदर्भात परिचय पत्र, २ कलर पासपोर्ट फोटोसह नोंदणी न्यू अनंत मेडीकल्स रतनलाल प्लॉट अकोला, जानोरकर मंगल कार्यालय कौलखेड, गजानन डिवरे डाबकी रोड, सुभाष म्हैसने डाबकी रोड जुने शहर, गजानन पुंडकर मोठी उमरी, ज्ञानदेव वनारे मोठी उमरी, निलेश पवित्रकार किसान ट्रॅक्टर्स शिवणी अकोला.तरी जास्तीत जास्त समजा बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन अध्यक्ष अशोक अमानकर, उपाध्यक्ष विनायक शेळके, रघुनाथ खडसे, सचिव दिनकर सरप, कोषाध्यक्ष राजेन्द्र मोहोकार, प्रसिद्धी प्रमुख प्रदिप खाडे, पाटील समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा जोत्स्ना चोरे, सचिव सुषमा निचळ व इतरही पदाधिकाऱ्यांनी केले आहे.