काळ्या मायचं सौंदर्य घेऊन येणारी विठ्ठल वाघांची कविता. सारं मराठीचं शिवार सुगंधित करते. निःशब्द झालेली शिवारं शतकानुशतकांची तहानलेली. उन्हाच्या झळांनी रापलेली काळी माय. हिरव्या ज्वारीच्या कोंबाच्या पोटरीतून तरारून येणारं ज्वारीचं रसरशीत भरलेल्या दाण्याचं कणीस पावसाच्या कोसळणाऱ्या सरीवर सरीसारखीच राशींवर राशी भरभरून देणारी विठ्ठल वाघांची कविता : झोळी झाडाला टांगून राबराबते […]
संपूर्ण जग बंद पाडणारा कोरोना लवकरच होणार हद्दपार! WHO चे संकेत
मुंबई, 15 सप्टेंबर : जगात कोरोना व्हायरसचा शिरकाव होऊन आता तीन वर्ष झाली आहेत. या तीन वर्षात जगात मोठे बदल झाले. संपूर्ण जग काही काळ बंद पडलं होतं. लाखो लोकांचा मृत्यू झाला. हजारो कोटींचे नुकसान झाले. जगातील प्रत्येक देशाला वेठीस धरणारी करोना व्हायरसची महामारी आता संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक आरोग्य […]
वऱ्हाडी बोलीभाषेतील लघुकथा : बझार
इतवार ऊजयला होता. अज् वावरात अन् शायेत जा च बंड्याले कामं नोतं. इतवार म्हनजे पोट्यायच्या चंगळबाजीचा दिस. खानं – पीनं. हुंडारनं. देवळावर जानं. गोठानावर ऊगाचं चकरा मारनं. सामटायनं फिरनं. पांदनीत जावूनं झोपनं. कुत-यायच्या हेंडूकाले गोटे मारनं. मारक्या बोकळ्याले माथ्यावर तर हातानं दाबूनं हुलक देनं. फुलपाखरायले पकळनं. काजव्यायले पकळूनं डब्बीत भरनं […]
पपई खाल्ल्याने तुमचे ‘हृदय’ आणि हाडे’ राहतील मजबूत
पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पोटाशिवाय पपई हाडांसाठीही फायदेशीर आहे. पपईआपले संपूर्ण शरीर निरोगी ठेवते. यासोबतच पपई तुमच्या हृदयाची आणि हाडांचीही काळजी घेते. आहारतज्ञ देखील पपई खायला सांगण्याचे हे एक कारण आहे. रोज पपईचे सेवन केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल.पौष्टिकतेने भरपूर असलेली पपई अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी गुणकारी आहे. […]
मिठाच्या पाण्याचे आरोग्याला भरपूर फायदे, डॉक्टरकडे जाणेच विसराल!
मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. पण या नैसर्गिक मिनरलचे आरोग्यासाठी अनेक फायदेही होतात. ब्लड शुगर नियंत्रित करणे, वजन कमी करणे इत्यादीसाठी मीठ फायदेशीर आहे. इतकेच नाही तर मीठ आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असते. मिठाच्या पाण्यात मिनरल्स जसे की, कॅल्शिअम, सिलिकॉन, सोडियम इत्यादी आढळतात.त्यामुळे त्वचेसाठी […]
लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी प्रकाश भिलवंडे
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क नांदेड – श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता. उमरी यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सतराव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रकाश भिलवंडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे. नवोदित व प्रथितयश साहित्यिकांचे संमेलन या संस्थेतर्फे दरवर्षी भरविण्यात येते. […]
मधुमेहावर शस्त्रक्रियेद्वारे नियंत्रण शक्य : डॉ.गोयल
मधुमेहाचा आजार म्हटला तर अनेक विचार मनात घोळू लागतात. रक्तातील साखर वाढल्या अनेक गोड पदार्थ खाण्यावर नियत्रंण येते. सर्वात भयानक आजारापैकी हा एक आजार असल्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तीला सर्वसामन्य जीवन जगण्याच्या क्षमतेवर अनेक बंधने येतात. त्या शिवाय आहारावरील बंधने, वेळेवर औषधांचे सेवन, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे, अशा अनेक गोष्टी न […]
भोसलेकालीन विदर्भातील मस्कऱ्या गणपती
गणेशोत्सवाची धामधूम संपत नाही तोच १२ सप्टेबरपासून विदर्भात विविध ठिकाणी हाडपक्या (मस्कऱ्या) गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नागपुरातील सीनियर भोसला पॅलेसमधील हाडपक्या गणपतीला २ ३५ वर्षांचा इतिहास असून परंपरागत पद्धतीने तो आजही साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दहा विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात […]
स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरभरती
वऱ्हाडवृत्त डिजिटील ऑफ इंडियात ज्युनिअर असोसिएट्स पदाकरिता नोकरभरती होणार आहे. या नोकरभरतीमध्ये जास्तीत जास्त स्थानिक भुमिपुत्रांची भरती व्हावी म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ प्रयत्नशील असून इच्छुक उमेदवारांनी या भरतीकरिता www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर मंगळवार २७ सप्टेंबर २०२२पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन केले आहे. नोकरभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ ऑगस्ट […]
झेपावे चंद्राकडे…
‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसाने घेतला आहे.चंद्रावरच्या मातीमध्ये अनेक मूलद्रव्ये आहेत. माणसाच्या दृष्टीने ती अमोल आहेत. चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. मात्र, या साऱ्याला एक आणखीन पदर आहे, तो चीनच्या आक्रमक संशोधनाचा. अनेकांच्या भावजीवनाचा हळवा भाग असलेल्या चंद्रावर माणसाने पुन्हा एकदा स्वारी करण्याचे […]