कलर थेरपी म्हणजे क्रोमोथेरपी. या थेरपीबद्दल तुम्ही ऐकलं असेलचं. वैद्यकीय शास्त्रातील अनेक महत्त्वाच्या थेरपीमध्ये कलर थेरपीचाही समावेश होतो. कारण औषधांप्रमाणेच रंगांचाही आपल्या मेंदूवर प्रभाव पडतो. यामध्ये रंगांचा वापर औषधासाठी केला जातो. रंगांमुळे व्यक्तीचा मूड, वागणूक आणि तणावाची पातळी प्रभावित होते हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. शरीरातील तत्वांना समतोल राखण्याचे काम रंग करतात. म्हणूनच काही रंग पाहून आपल्याला शांत वाटतं, तर काही रंगांमुळे आपली तणावाची पातळी वाढते. तर काही रंग डोळ्यांना आनंद देतात त्यामुळे मूडही फ्रेश होतो. यामुळेच काही केसेसमधे डॉक्टर कलर थेरपीचा सल्ला देतात. त्यासाठी आपण प्रत्येक रंगाचे वैशिष्ट्य समजून घेऊया.
लाल :- लाल रंग ऊर्जेशी संबंधित आहे. यामुळे ज्या व्यक्तींना लाल रंग आवडतो त्या नेहमी ऊर्जावान असतात. त्या तुम्हाला कधीच थकलेल्या दिसत नाहीत.
नेहमी हसतमुख आणि फ्रेश दिसतात. प्रत्येक
काम त्या ऊर्जेने करतात आणि त्यात यशही मिळवतात.
हिरवा :- हिरवा रंग हा समृद्धीचा आणि प्रसन्नतेचा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे टेन्शन असेल आणि तुम्ही हिरव्यागार निसर्गात फिरायला गेलात तर तुमचे टेन्शन लगेच निवळते.
पिवळा :- पिवळा रंग पाहता शांत वाटते. सर्व रंगांमध्ये पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. आशावाद, सकारात्मकतेसाठी पिवळा रंग
ओळखला जातो. पिवळ्या रंगाचा संबंध सूर्यकिरणांशी जोडला जातो. त्यामुळे या रंगात वेगळी ऊर्जा असते.
निळा :– निळा रंग हा शांततेचे प्रतीक म्हणूनही ओळखला जातो. निळा रंग डोळ्यांना आल्हाददायक आहेच. शिवाय भरभराटीचा रंग म्हणूनही निळ्या रंगाची ओळख आहे.
सफेद :- सफेद म्हणजे पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे. पांढरा रंग मनाला शांत करतो. शरीरातील तत्व बॅलन्स करतो. यामुळे सफेद रंग बघितल्यावर समोरची व्यक्तीही तुमच्याशी शांतपणे बोलते. या रंगातील ऊर्जा तुम्हाला समतोल राखण्यास मदत करते. यामुळे विविध आजारांमध्ये कलर थेरपीचा उपयोग केला जातो. प्रत्येक रंगाचे गुण बघूनच त्याचा वापर आजारानुसार रुग्णावर केला जातो.