‘बेसल टीअर्स’ म्हणतात. हे अश्रू डोळ्यांचा पृष्ठभाग ओलसर ठेवतात आणि डोळ्यांना कोरडेपणाच्या समस्येपासून वाचवतात. हे अश्रू साधारणपणे डोळ्यांतून बाहेर पडत नाहीत. Why tears come from the eyes sometimes while laughing, sometimes while crying?

अश्रू निर्माण होण्याच्या प्रक्रियेमागे आपल्या डोळ्यांमध्ये असणाऱ्या ‘लॅक्रिमल ग्रंथी’ कार्य करत असतात. साधारणपणे एका दिवसात आपल्या डोळ्यांतून अर्ध्या चमच्याहून कमी अश्रू बाहेर पडतात. अश्रूंमध्ये पाण्याबरोबरच मीठ, तेल, म्युकस आणि काही जंतुनाशक रसायनंदेखील असतात. या रसायनांमुळे डोळ्यांना संसर्गापासून संरक्षण मिळतं. पापण्यांची उघडझाप झाल्यामुळे हे अश्रू डोळ्यांच्या पृष्ठभागावर सम प्रमाणात पसरतात. जेव्हा कांद्यातून निघणारे केमिकल्स, धूळ आणि धूर यांसारखे बाह्यघटक डोळ्यांत शिरतात तेव्हासुद्धा डोळ्यांतून अश्रू बाहेर पडतात. या अश्रूंना ‘रिफ्लेक्स टीअर्स’ म्हणतात.
भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या शरीरातली हॉर्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. बाल्टिमोरमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडमधले मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट प्रोव्हिन म्हणाले, की हसताना आणि रडताना मेंदूचा एकच भाग जास्त सक्रिय असतो. सतत हसण्याची किंवा रडण्याची क्रिया मेंदूच्या पेशींवर जास्त दबाव टाकते. अशा परिस्थितीत, कॉर्टिसोल आणि ॲड्रेनलिन नावाची स्ट्रेस हॉर्मोन्स शरीरात सक्रिय होतात. हसताना किंवा रडताना शरीरात होणाऱ्या असामान्य बदलांसाठी हे हॉर्मोन्स जबाबदार असतात.
इमोशनल टीअर्स आणि रिफ्लेक्स टीअर्स हे दोन वेगळे प्रकार आहेत. जेव्हा आपण दुःख, आनंद किंवा भीती यांसारख्या भावना अनुभवतो तेव्हा डोळ्यांतून भावनिक (इमोशनल) अश्रू बाहेर पडतात. डोळ्यांत धूळ गेल्यास किंवा कांद्यातल्या केमिकल्समुळे रिफ्लेक्स अश्रू सोडले जातात. जेव्हा भावनिक अश्रू बाहेर पडतात तेव्हा डोळ्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येतं. कधी-कधी हे अश्रू नाकातून पाण्याच्या रूपा बाहेर पडतात.