मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात फाशी झालेला अतिरेकी याकुब मेमन याच्या कबरीचा वाद उफाळून आलेला आहे. त्याच्या कबरीला मार्बल व एलईडी लाईट लावण्यात आले. या मानसिकतेला काय म्हणावे? दुर्दैवच म्हटले पाहिजे. हा प्रकार ठाकरे सरकारच्या काळात झालेला आहे, असे म्हटले जाते. वास्तविक पाहता एखाद्या अतिरेक्याची कबर सर्वसामान्य लोकांच्या सोबत ठेवणे हा सर्वसामान्य जनतेचा अपमानच आहे. कदाचित एखाद्या देशभक्ताच्या बाजूला अतिरेक्याला झोपवले जाईल आणि हा त्या देशभक्ताचा अपमान होईल. अतिरेकी कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा असो; तो त्या धर्माच्या नीतिमूल्यांप्रमाणे तर वागलेलाच नसतो. मग त्या धर्माप्रमाणे त्याला मूठमाती तरी का द्यावी? अमेरिकेने सद्दाम हसेनला फाशी दिल्यावर त्याचा मतदेह समद्रात फेकून दिला. उद्देश हा होता की, त्याची कुठेही कबर बनू नये व त्या कबरीवर कोणीही फले वाह नये. त्याची कबर त्याचे स्मृतिस्थळ होऊ नये यासाठीच अमेरिकेने हे केलेले होते. भारतही तसे करू शकला असता. परंतु सर्वसामान्य न्याय म्हणून त्या अतिरेक्याचा मृतदेह त्याच्या घरच्यांना सोपविण्यात आला. याकूब मेमनच्या जनाजामध्येसुद्धा हजारो लोक सामील झाले होते. यावरून अतिरेक्याचे त्या समाजातील स्थान आपल्या लक्षात येते. इतिहासाचे विस्मरण होऊ देणे हा आपल्या समाजाचा दुर्गुण आहे. समाज आपल्या इतिहासाला विसरून जातो. त्यामुळे कोण अतिरेकी होता व कोण देशभक्त होता, याचा फरक लोकांना त्याच्या कबरवरून किंवा थडग्यावरून होत नाही. काही वर्षांनी या थडग्याची मजार बनविली जाते व एखादा अतिरेकी एखाद्या संताप्रमाणे पूजनीय होऊन जातो. लोक त्याच्या मजारीवर ‘आम्हाला धंद्यामध्ये बरकत येऊ दे’ किंवा ‘मूलबाळ होऊ दे’ यासाठी प्रार्थना करायला जातात, हे केवढे मोठे दुर्भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला व त्याला प्रतापगडावर ठार मारला. आपल्या सभ्यतेप्रमाणे त्या प्रतापगडावर त्याचे दफन करण्यात आले. परंतु काळ बदलला व अफजल खान हा कोणी आतंकवादी होता. तो स्वराज्यावर चालून आलेला होता. तो शिवाजी महाराजांचे प्राण घ्यायला आला होता. ही गोष्ट सोयीस्करपणे बाजूला सारून तिथे त्याची भव्य मजार उभी राहते. तिथे जाणारा हिंदू समाज अफजल खानाला ‘मूलबाळ होऊ दें यासाठी नवस बोलतो. तेथे चढवलेल्या चादरीवर पैसे टाकतो. याला काय म्हणावे? देवभोळेपणा की मूर्खता! विशेषतः काँग्रेसच्या काळामध्ये असे थडग्यांचे उदात्तीकरण मजारांमध्ये खप झालेले आहे. संपूर्ण देशभर जर आपण बघितले तर आपल्याला अशा हजारो मजारी दिसतील की, ज्या कोणत्याही संताच्या नाही किंवा फकिराच्या नाही. ठिकठिकाणी एवढे संत आणि फकीर झालेच कुठे? जे झाले ते धर्मांध व अतिरेकीच होते. त्यांचा या समाजाशी व समाजाच्या कल्याणाशी काहीही संबंध नव्हता. परंतु, तरीही त्यांचे थडगे उभे राहते. पुढे त्याची मजार होते. त्याचा दर्गा होतो व भारतामध्ये असे हजारो दर्गे आज उभे आहेत. सर्वसामान्य हिंदू समाज देवभोळेपणे या मजारींवर आणि दयावर जात असतो, हेही दुर्भाग्यच आहे. हिंदूंची मानसिकता प्रत्येक कणाकणांमध्ये देव पाहण्याची आहे. त्यामुळे कदाचित तो दर्यामध्येसुद्धा देव पाह शकत असेल. वास्तविकता मात्र हीच आहे की, धर्माध कट्टरवादी जिहादी यांचे भारतामध्ये अनेक मजारी व दर्गे उभे आहेत. हे अतिरेक्याचे उदात्तीकरण आहे. एखाद्या मजारीवर सुशोभीकरण करण्यात आले असते तर हिंदू समाजाला त्याचे काहीही वावगे वाटले नसते. परंतु, याकुब मेमनसारख्या मुंबई बॉम्बस्फोटातील अतिरेक्याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात येते व त्याची माहिती गुप्तचर विभागाला लागू नये. त्याने ती माहिती सरकारला देऊ नये. यावरून गुप्तचर विभागाचे अपयश तरी लक्षात येते किंवा सरकारचा नाकर्तेपणा तरी लक्षात येतो. एखाद्या अतिरेक्याची कबर हे त्याचे स्मृतिस्थळ बनता कामा नये. असे झाल्यास हजारो तरुण त्याच स्मृतिस्थळाकडे पाहून पुन्हा दहशतवादाची प्रेरणा घेतील व मुंबई बॉम्बस्फोटासारखे कृत्य घडविण्यासाठी सज्ज राहतील.
मागील काही काळात आयएसआयएसने जगामध्ये धुमाकूळ घातला होता. जगभरातील तरुणांना त्यांनी आपल्या सैन्यांमध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यावेळेस भारतातील काही तरुण त्यात सामील व्हायला गेले होते. यावरून आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा भारतातील विशिष्ट समाजावर परिणाम पडत असतो व त्यालाही तो मार्ग योग्य आहे, असे वाटत असते. काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या अतिरेक्यांच्या जनाजामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सामील होत असतात. बुरहान वाणीसारखा अतिरेकी हा काश्मीरमध्ये हिरो बनतो; पोस्टर बॉय बनतो ही येथील जनतेकरिता व देशाकरिता चिंतेचीच बाब होय. दहशतवादाचे बीज विशिष्ट धर्माच्या समाजात खोलवर रुजलेले आहे. त्यांची माथी भडकविण्याचे काम सातत्याने सुरू असते. अतिरेक्यांना मदरशामध्ये आश्रय देण्याच्या घटना घडत असतात. मदरशामध्ये शिकणाऱ्या लहान मुलांवर या सर्व गोष्टींचा काय परिणाम पडत असेल? ज्यांनी बालपणी दहशतवाद्यांपासून प्रेरणा घेतलेली आहे, असे लोक पुढे दहशतवादी बनले नाही तर त्यात नवल ते काय? अतिरेक्यांच्या कबरीचे जर स्मृतिस्थळ व्हायला लागले तर जो समाज त्यांचे उदात्तीकरण करीत आहे त्याच्या राष्ट्रनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याखेरीज राहणार नाही. वास्तविक अतिरेकी जरी एखाद्या विशिष्ट धर्माचा असेल तरीही तो अतिरेकी होता, देशद्रोही होता. आमच्या समाजाची शांतता बिघडविण्याचे कार्य त्याने केलेले होते आणि म्हणून त्याच्यावर सामाजिक बहिष्कारच टाकला गेला पाहिजे. त्याच्या घरच्यांनीसुद्धा त्याच्या प्रेताची मागणी करू नये, अशी मागणी केली जाते. कारण समाजामध्ये अतिरेक्यांना स्थान आहे, असाच त्याचा अर्थ होतो. समाजाला जर असे वाटत असेल की, सुरक्षा दलांशी लढताना मारला गेलेला अतिरेकी हा शहीद आहे; म्हणजे धर्माकरिता मरण पत्करलेले असेल तर त्याला सन्मान प्राप्त होईल. एकंदरीत ही मानसिकताच अत्यंत चुकीची आहे व देशाच्या शांततेला घातक आहे. म्हणूनच ही बदलविणे अतिशय आवश्यक आहे. समाज कोणताही असो; त्यांनी आपल्या समाजामध्ये अतिरेकी तयार होणार नाही; देशद्रोही तयार होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अतिरेक्यांचे व अतिरेकाचे उदात्तीकरण थांबविलेच पाहिजे.
अमोल पुसदकर ९५५२५३५८१३ (लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)