महावितरणच्या पेमेंट वॉलेटसाठी लघू उद्योजकांना संधी वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. महावितरणने स्वतः चे पेमेंट वॉलेट सुरू केले असून आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या पतसंस्था तसेच किराणा, मेडिकल व जनरल स्टोअर्सचालकांना वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषतः ग्राम ीण भागात […]
भारतीय बोली भाषांवर गंडांतर
भाषा ही केवळ भाषा नसते. तर, हजारो वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या भाषांमध्ये मूलभूत ज्ञानाचा एक महत्वपूर्ण संग्रह, ऐवज असतो. थेट अनुभवातून मिळालेले हे ज्ञान अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करण्यास सक्षम ठरत असते; परंतु या ज्ञानाची जणू आपल्याला गरजच नाही, अशा तऱ्हेने आपण आपल्या भाषांवर होणारे आघात निमूटपणे सहन करतो आणि ‘ज्ञानभाषा’ म्हणून […]
सोन्याच्या अंगठीमागचे वैदिक शास्त्र
अनेक अलंकारांपैकी अंगठी हादेखील एक अलंकार असल्याने अनेकजण फॅशन म्हणून बोटात अंगठी घालतात, तर काहीजण आपल्या राशीनुसार अंगठी घालतात, मात्र अनेकवेळा | अंगठीमागचे वैदिक शास्त्र माहीत नसल्याने गफलत होते. या अर्धवट माहितीमुळे काहीजण कोणत्याही धातूची अंगठी कोणत्याही बोटामध्ये घालतात. ज्याचा विपरित प्रभाव त्यांच्या ग्रहस्थितीवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार हाताच्या पाचही बोटांवर […]
मधुमेहग्रस्तांसाठी एकाकीपणा घातक
एकाकीपणा कुणासाठीही चांगला नसतो; परंतु मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. मधुमेहाने पीडित असलेल्या लोकांमध्ये हृदयविकारासाठी खराब आहार, धूम्रपान, व्यायामचा अभाव किंवा नैराश्याच्या तुलनेत एकाकीपणा मोठा धोका ठरू शकतो असे टुलेनच्या संशोधकांना आढळून आले आहे. युरोपियन हार्ट नियतकालिकात प्रकाशित त्यांच्या अहवालाकरिता ३७-७३ या वयोगटातील मधुमेहाने ग्रस्त १८, ५०० […]
समस्या ॲमिबियासीसची
ॲमिबियासीस ही एक विश्वव्यापी समस्या आहे. प्रदूषित पाणी पिणे, दुषित भोजन घेणे अथवा वाईट सवयी यांच्या कारणाने हा रोग मुख्यत्वे होतो. या रोगापासून बचावासाठी पुढील गोष्टींवर लक्ष द्यावे. पाणी, खाद्यपदार्थ, भाज्या, फळे आदी प्रदूषित होण्यापासून बचाव करावा. उघड्यावर शौच- स बसू नये. शौचानंतर तसेच भोजन घेण्यापूर्वी हात साबणाने चांगल्याप्रकारे धुवावेत. […]
मुलींनो, महिलांनो या ठिकाणी सावधगिरी बाळगा
मुली, युवती, महिलांवरील वाढते अन्याय, अत्याचार, विनयभंग, अतिप्रसंग यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. त्यामुळे त्यावर वेळोवेळी उपाययोजना करणे आणि अंमलबजावणी करणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. अन्याय करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता जर आपण बदलू शकलो आणि कठोर पावले उचलू शकलो, तर नक्कीच अशा […]
आता रेल्वे स्टेशनवर काढावी लागणार नाही रात्र
हॉटेलसारखी खोली मिळणार स्वस्तात तुम्ही रेल्वे गाडीने प्रवास करीत असाल आणि तुम्हाला रात्री रेल्वे स्थानकावरच थांबावे लागणार असेल, तर आता तुम्हाला स्थानकावर रात्र काढावी लागणार नाही. भारतीय रेल्वे स्थानकातच प्रवाशांना राहण्यासाठी खोल्या उपलब्ध करून देते. त्यामुळे हॉटेल किंवा इतर निवासस्थान शोधण्याची गरज भासणार नाही. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे, या खोल्या […]
६० कोटी भारतीयांवर जलसंकट
नीती आयोगाचा अहवाल • हवामान बदलाचा विपरीत परिणाम, जलस्रोत आटले हवामान बदलामुळे मान्सून आणि त्यावर अवलंबून असलेल्या जलस्रोतांवर विपरीत परिणाम झाला आहे. भारतातील अनेक प्रमुख नद्या कोरड्या पडल्याने भारतासमोर जलसंकट आहे. इतकं भीषण जलसंकट यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. भारताची लोकसंख्या जगाच्या १८ टक्के आहे, तर देशात फक्त ४ टक्के जलसंपत्ती […]
काव्यभीमायन
काव्यभीमायन डॉ.विठ्ठल भिकाजी वाघ, अकोला, मो. : 9822726347 दोन शब्द ….। डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे अशा वादळाचं लौकिक नाव, जे उद्ध्वस्त करून गेलं, हजारो वर्षांच्या जुलमी मनुवादी व्यवस्थेला नि प्रस्थापून गेलं समताधिष्ठित मानवतावादी लोकशाही व्यवस्थेला. दलितांचा, उपेक्षितांचा नव्हे, सर्व विद्वान पंडितांचा बापच होता तो. म्हणूनच आदराने संपूर्ण जग त्यांना […]
चिंतनशील लेखकाचा गौरव
कादंबरी, कथा, समीक्षा, ललितबंध, संपादन अशा विविध प्रांतात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारं आजच्या मराठी लेखकांच्या पिढीतील एक आघाडीचे नाव म्हणून प्रा. डॉ. रवींद्र केशवराव शोभणे यांचा उल्लेख करावा लागेल. खरसोलीसारख्या गाव खेड्यातून आलेला एक युवक साहित्यिक प्रवास करता करता वयाच्या एका टप्प्यावर ९७ व्या अखिल भारतीय संमेलनाचा संमेलनाध्यक्ष होतो, हा […]