वातावरणातील बदलामुळे होणारी अतिउष्णता आणि आर्द्रतेमुळे ॲमेझॉन रेनफॉरेस्टची हरितगृह वायू मिथेन शोषण्याची क्षमता ७० टक्क्यांनी कमी होऊ शकते. ब्राझीलच्या साओ पाउलो विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. (Climate change will reduce the Amazon’s capacity to absorb methane: Research)दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन रेनफॉरेस्टच्या काही भागांमध्ये तापमानवाढ हवामानामुळे अतिवृष्टी होण्याची […]
Month: October 2024
दूरदर्शनवर २४ तास सिंधी भाषा वाहिनी सुरू करण्याची याचिका फेटाळली
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्राला दूरदर्शनवर 24 तास सिंधी भाषा वाहिनी सुरू करण्याचे निर्देश देणारी याचिका फेटाळली.सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. न्यायमूर्ती पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी गैर-सरकारी संस्था (एनजीओ) सिंधी संगतची याचिका फेटाळून लावली. भाषा टिकवून ठेवण्याचे […]
Earthquake : पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; नागरिक घाबरले, कोणतीही जीवितहानी नाही
पालघर – तलासरी-डहाणू तालुक्यातील काही गावांना मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास (4 वाजून 47 मिनिटाला) भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल मोजली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील कंक्राटीजवळ जमिनीखाली 5 किलोमीटर खोल असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाचा धक्का डहाणू, […]
समीक्षा.. बरे झाले देवा
बरे झाले देवा हे काव्य संग्रहाचे नाव व जगतगुरू संत तुकारामचे छायाचित्र ह्या दोन बाबी एकरूप आहेत. कारण बरे झाले देवा हे उदगार तुकोबांनी अनेक वेळा काढले. तसेच एक वेळ वैराग्यमूर्ती गाडगेबाबा कीर्तन करत असताना त्यांना निरोप आला की त्यांचे सुपुत्राचे देहावसान झाले आहे तेव्हा गाडगेबाबा म्हणाले असे मेले कोट्यानू […]
पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यांना जाहीर
पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार या वर्षी आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. प्राध्यापक आशालता कांबळे या फुले-आंबेडकरी चळवळीतील एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या तसंच संविधान मूल्यांचं साहित्य लिहिणाऱ्या लेखिका म्हणून परिचित आहेत. पुरस्काराचे दुसरी मानकरी […]
जाणून घ्या काय आहे अटल पेन्शन योजना, ज्याद्वारे तुम्हाला दरमहा ५ हजार पेन्शन मिळेल
नवी दिल्ली: अटल पेन्शन योजना (APY) ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक असून, वृद्धांसाठी क्रांतिकारी योजना म्हणून उदयास आली आहे. आतापर्यंत सात कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला अटल पेन्शन योजनेबद्दल सविस्तरपणे सांगतो, ज्याद्वारे वृद्धांना दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळेल. वास्तविक, केंद्र […]
पेजर फुटू शकतात तर ईव्हीएम का हॅक होऊ शकत नाही? निवडणूक आयोगाने उत्तर दिले
नवी दिल्ली: ईव्हीएम हॅकिंगच्या वाढत्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले की, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) हॅक करणे शक्य नाही, तर पेजर फुटण्याच्या अलीकडील घटनांचा हवाला देत काही लोक ईव्हीएमच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. […]
राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत निधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणूक अधिसूचना येत्या २२ तारखेला जारी होईल, २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरला होईल, तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता […]
वाचन संस्कृती गरजेची!
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी युवा पिढीमध्ये वाचनाचे बीज रुजले जावे, यासाठी डॉ. कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त 15 ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा होतो. ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीवरून वाचनाला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात येते. वाचनाचा प्रचार, प्रसार होण्यासाठी शाळा, कॉलेजातून विविध उपक्रम राबविले जातात. मित्र, कुटुंबातील सदस्य, […]
तलाठी आणि कोतवाल पदाच्या नावात राज्य सरकारकडून बदल
राज्य सरकारनं तलाठी पदाचं नाव बदलून ग्राम महसूल अधिकारी केलं आहे. कोतवाल पदाचं नाव बदलून महसूल सेवक करण्याचा शासन आदेशही सरकारनं आज जारी केला. या नाव बदलामुळं तलाठी किंवा कोतवालांचं काम किंवा वेतनश्रेणीत काहीही बदल होणार नाही. तलाठी आणि कोतवालांच्या संघटनेनं केलेल्या मागणीनुसार सरकारनं ही नावं बदलली आहेत.